पुस्तक
पुस्तक
खरं तर ज्ञानाचे भंडार
असतात काही पुस्तकं
वाचकाला खिळवून ठेवत
झुकायला लावतात मस्तकं
सर्व धर्म ज्ञानग्रंथ वाचावेत
अन् व्हावे त्यापुढे नतमस्तक
पुस्तक असते मनोरंजनाचे
घरबसल्या अनोखे साधन
पुस्तकंच लेखकांना देतात
कधी कधी योग्य मानधन
पुस्तकांमुळे अवश्य होते
प्राप्त खरे विद्यारुपी धन
पुस्तकांशी केलेली मैत्री
कधीच वाया जात नाही
पुस्तक योग्य मार्गदर्शन
केल्याविना रहात नाही
पुस्तक वाचणारा ज्ञान
घेतल्याविण रहात नाही
पुस्तकं वाचन संस्कृती जोपासण्यासाठी पुस्तक काय असतात हे समजून सांगण्याचा प्रयत्न या कवितेतून केला आहे.