Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sanjay Raghunath Sonawane

Others

4  

Sanjay Raghunath Sonawane

Others

पुरस्कार--

पुरस्कार--

1 min
477



पुरस्कार म्हणजे उपेक्षितांची व्यथा

अधिकृत गुणवत्ता नाकारलेली समाज व्यवस्था

इथे पुरस्कार ही ठरवून दिले जातात

समाज विचारांच्या ज्ञानाला जीवंत गाडले जातात


शासन यंत्रणा कधी, कधी कुचकामी ठरते

गुन्हेगारानाही पुरस्कार खेळनी सारखे वाटप होते

लोकशाहीला त्यांची लाज वाटते

पुरस्कार घेणाऱ्याने मात्र लाज वेशिला टांगलेली असते


पाहणारे सुद्धा मजबूर म्हणून आलेले असतात

लबाड मात्र खुशीत लबाडीचा आनंद व्यक्त करतात

पुरस्कार देणारे सन्माननीय पाहुणे अपरिचित असतात

लबाड लोक लबाडी झाकून ठेवून सभ्यतेचे भाषण करतात


सोहळा दिमाखात साजरा करतात

आपण कुणावर तरी अन्याय केला हे लबाड विसरतात

पुरस्काराचे महत्त्व यानीच संपविले

उपेक्षित मात्र प्रतिक्षेच्या वाटेवर कायम तसेच राहिले


लबाडानाही आता चांगले दिवस येऊ लागले

स्वाभिमानी मात्र ताठ मानेने इमानदारीने जगले

त्यांना फुकटचा आणि पापाचा पुरस्कार नकोसा वाटतो

खऱ्या कष्टाचाच पुरस्कार कायम पचनी पडतो


जात, धर्माची इथेही सतत दखल घेतली जाते

जात, धर्म पाहून पुरस्काराची घोषणाबाजी होते

खरे पुरस्काराचे मानकरी काळाच्या पडद्याआड गेले

विद्वान कोण ते लबाडानीच न्याय करून ठरविले


Rate this content
Log in