पुरावा
पुरावा
1 min
148
द्यावा लागतो पुरावा
जगात टिकण्याचा
दाखला देत कायम
स्वतःच्या ओळखीचा
द्यावा लागतो पुरावा
कष्ट करून मज
कुटुंबासाठी राबते
कळेल कधी तुज
द्यावा लागतो पुरावा
आजकाल प्रेमाचा
विश्वासाला जाई तडा
नाश होई नात्याचा
द्यावा लागतो पुरावा
सतत चारित्र्याचा
डागाळू नये प्रतिमा
वणवा काळजीचा