पुराची वेदना
पुराची वेदना
💧 पुराची वेदना 💧
नदीच्या प्रवाहाने रान, झोपडं नेलं,
हातातलं पीकही वाहून गेलं,
खरडल्या जमिनीची सारी आस माती झाली,
शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रूंची भरती आली.
सोयाबीनची रोपं हुमनीने खाल्ली,
आता पुराच्या पाण्याने स्वप्नंही चिरडली,
अडगळीला गेलेले श्रम, साचलेली घामाची रेघ,
पोटभर अन्नासाठी पुन्हा उभी झाली नेग.
काळोख आहे गडद पण सुर्य पुन्हा कधी उगवेल,
शेतकरी पुन्हा कधी उभा राहील,
कधी नवा पेरा करेल,
जमिनीत धैर्य रुजलंय,
पण मनात आहे विश्वास,
कष्टावर चाललेलंच हे जीवन खास.
पावसाच्या लाटांनी शेत सारे वाहिले,
पिकांच्या रोपट्यांनाही दुःख मोठे झाले,
घाम गाळून पेरले हे स्वप्न सारे कोमेजले,
अश्रू ओघळले.
आभाळाने गाळल्या साऱ्या कापसाच्या पाती,
पुराच्या पाण्याने नेली शेतांची खाती,
दुःखाच्या छायेतही आशेची राहिली ज्योती,
लावलेला पैसा अन् श्रम न संपती.
धरतीमातेच्या ओंजळीतील मायेवर,
शेतकरी उभा राहील धीर धरून पुनःवर,
पेरणीच्या मंत्रात गुंतून विश्वासावर,
सूर्य उगवेल.
✍️
कवी - ज्ञानेश्वर आल्हाट
९६७३१५८३४३
अंजनी बुll

