Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Yogini Bhalkikar "कृष्णाई"

Others

2  

Yogini Bhalkikar "कृष्णाई"

Others

पुन्हा तुझ्या प्रेमात पडायचंय

पुन्हा तुझ्या प्रेमात पडायचंय

1 min
251


ती पहिली ओळख,

तो 'hello' म्हणण्यासाठी,

पुढे आलेला तुझा हात,

मला पाहून केलेलं तुझं पाहिलं हसू,

मला हे पुन्हा अनुभवायचंय,

मला पुन्हा एकदा तुझ्या प्रेमात पडायचंय...


ती पहिली अनपेक्षित भेट,

तो सोबत घालवलेला वेळ,

ती आपल्या मनाची झालेली गुंफण,

मला हे पुन्हा जगायचंय,

मला पुन्हा एकदा तुझ्या प्रेमात पडायचंय...


तो तुझा झालेला पहिला स्पर्श,

ते रात्रंदिवस केलेलं हितगुज,

ते एकमेकांना समजलेलं प्रेम,

आणि पुन्हा भेटण्याची ती इच्छा,

मला हे पुन्हा पाहायचंय,

मला पुन्हा एकदा तुझ्या प्रेमात पडायचंय...


Rate this content
Log in