Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Prashant Shinde

Classics Inspirational

4  

Prashant Shinde

Classics Inspirational

पतंग..@

पतंग..@

1 min
388


मुलांचा मी आवडता

पालकांचा नावडता

सुट्टी मिळता मी हवा हवा

छंद जडतो नवा नवा...

आकाशाशी मैत्री माझी

शेपूट घेऊन उडतो छान

उंच उडता आकाशी

आकाशातही मिळतो मान..

स्पर्धा माझी वाऱ्याशी

वाट अडवणाऱ्या धाग्याशी

गिरकी घेऊन पुन्हा उठतो

अन उंच आकाशी उडतो...

कोडे कसले मनात घेता

यारे या सारे या

माझ्यासंगे विहार करा

मनास थोडा विरंगुळा बरा...

स्वप्न आकाशी उडण्याचे

सदैव उराशी माझ्या असते

म्हणून उंच आवकाशतली

छबी माझी खूप छोटी दिसते...

पतंग म्हणतात मला

सर्वांचा मी आवडता

उंच भरारी माझीअकाशी

मोहक दिसते उडता उडता ....!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics