Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Rohit Khamkar

Classics Inspirational

4  

Rohit Khamkar

Classics Inspirational

प्रतिकार

प्रतिकार

1 min
433


येतील कितीही संकटे, बदलेल हा सारा काळ.

तयार आहे अशी ती, प्रयत्नांच्या फुलांची माळ.


हरलो नाही अजून, पण नक्की थोडा थकलोय.

प्रत्येक त्या अपयशाकडून, काही ना काही तरी शिकलोय.


बांधून शिदोरी अनुभवांची, लावतोय असा बुद्धीला जोर.

लढण्या आधीच परास्त करतो, चिंतेच्या विचारांचा घोर.


कधी कधी भिती वाटते, आता कसे होणारं.

थोडासा आढावा घेतला की, संकटही पळून जाणार.


पण एक झाले की एक, संपेल ते संकट कसले.

प्रयत्न एकच शेवट पर्यंत जगण्याचा, आपले आयुष्य हे असले.


कधी कधी वाटतं काहीच नको, एवढा होतो तिरस्कार.

पण सरते शेवटी आयुष्यच ते, चालतो तो फक्त प्रतिकार.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics