Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Umakant Kale

Inspirational

2  

Umakant Kale

Inspirational

प्रश्न उरला अखेरचा?

प्रश्न उरला अखेरचा?

1 min
1.5K


प्रश्न उरला अखेरचा,मिळे ना उत्त ?
काय चुकले हो माझे, द्या ना उत्तर?..धृ

खेळ नसिबाचा पाहिला,ना टुटली कंबर
संसार ताटून काही वर्षांत गेला नवरा वर 
पदरात माझ्या सोडून फुल,म्हणून जगले
माझे दु:ख त्याच्या डोळ्यात हरले

प्रश्न उरला अखेरचा,मिळे ना उत्तर ?
काय चुकले हो माझे, द्या ना उत्तर ?..१

फाटकी चोळी,फाटकी होती लुगडी
ना शिवला मि टिचभर मग पदर,मायाबाभडी
लेकरू माझं सोन्यासारखं,केला साजर
करून रक्ताचे पाणी, केला मोठा मी आजवर

प्रश्न उरला अखेरचा,मिळे ना उत्तर ?
काय चुकले हो माझे, द्या ना उत्तर ?..२

वासनेच्या परिसरात मी लढले

येता जाता नजरेने मी भांडले

सोसले वनवास मुला तुझ्यापाई

वाटलं करशील तू त्या क्षणाची भरपाई

प्रश्न उरला अखेरचा,मिळे ना उत्तर ?

काय चुकले हो माझे, द्या ना उत्तर ?..३

लग्न होताच तु मला विसरलास

म्हातारीचा म्हातारपणाला त्रासालास

मी तुझ्या बालपणात तुझ्या हट्टाला कुठे हरले

देऊन किती ही त्रास तरीही मी तुला जपले

प्रश्न उरला अखेरचा,मिळे ना उत्तर ?

काय चुकले हो माझे, द्या ना उत्तर ?..४

आई होउन मी होते रे वागले,ते कर्तव्य माझे

तू पण बघ आता मुलगा होऊन,कर्तव्य तुझे

मुलाचे बालपण,म्हताऱ्याचे म्हतारपण सारखे

आता तू पण होउन बघ,माझ्या आईवडीला सारखे

प्रश्न उरला अखेरचा,मिळे ना उत्तर ?

काय चुकले हो माझे, द्या ना उत्तर ?..५


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational