प्रीतझंकार
प्रीतझंकार
स्पर्श तुझा प्रेमवेडा
कणकण मोहरला
जाणीवांच्या स्पंदनांनी
प्रेमवृक्ष बहरला
वेड्याखुळ्या मम मनी
प्रीत तार झंकारली
धुंद गात्रे फुलारली
रोमरोमी सुखावली
नाद झंकार मधुर
सुखभरे प्राशियला
अमृताच्या तुषारांनी
धुंद जीव सुखावला
नुमजले दोघांसही
तारा कशा सैलावल्या
तार सप्तक सोडूनी
खर्जातही मंदावल्या
जाग आली स्वप्नातूनी
तारा तुटुनी भंगल्या
विखुरले प्रेमी जीव
विरे स्वर झंकारला