प्रगतीशील भारत
प्रगतीशील भारत
1 min
184
सुजलाम नि सुफलाम
धरती भारत देशाची
कृषीवल नवतंत्राने
मौक्तिके करती घामाची
युवा शास्त्रज्ञ प्रयत्नांती
भरच नवीन शोधांची
जीवन सारे अर्पूनिया
मान उंचावती देशाची
संगणक नि विज्ञानाचा
मेळ घालते युवा पिढी
अवघे विश्वचि एकच
तिरंगा जगी उंचावती
ज्येष्ठ नागरिक देशाचे
भान युगाचे ओळखती
चालू पिढीसवे आपुली
ज्ञानसंपदा वाढवती
अभिमान मज देशाचा
प्रगती प्रत्येक क्षेत्राची
कीर्तीध्वजा फडकवती
होईल प्रगती देशाची