Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Prashant Shinde

Action Classics Inspirational

3  

Prashant Shinde

Action Classics Inspirational

प्रगती

प्रगती

1 min
119


आभाळाचा कागद आणि समुद्राची शाई घेऊन

आईची महानता विशद करु पहायची पिढी

कोरा कागद, दौत टाक किंव्हा पेन घेऊन

तासंतास टक लावून मनात जोपासायची अढी....


आज उगवत्या सूर्याला पाहून

कोऱ्या कागदावरच्या रेषा पाहते

आणि प्रगतीचा घोषवारा विशद करण्या

मोबाईलचा लीलया वापर करते...


मनातली ती हूर हूर आणि घालमेल

कोठे गायब झाली कळत नाही

प्रेमाचा तो अवीट गोड भाव

कोठे विरला ते वळत नाही...


फक्त आणि फक्त जोडी टॉवरची पाहून

समाधान कोणीतरी होते याचे होते

आणि त्या चिठ्ठ्या चपाट्यांची आठवण

खोलवर प्रेमाची उमळ उठवते...


वाटते प्रगतीनेच या 

तिला नजरे आड केले

वायू लहरींच्या गोंगावात

कोठेतरी दूर फेकून दिले...


इतक्यात काय आश्चर्य ,रिंग खणखणली

कोठे आहात?या लवकर,चहा थंड होतोय,

पुन्हा गरम करणार नाही 

नसते लाड आता पुरवणार नाही...


भानावर आलो आणि घरचा रस्ता धरला

खूप झाले मोठा विचारांचा फेरफटका मारला

प्रगती टॉवर वर टांगली आणि

चहाची तलफ मस्त भागवली...


Rate this content
Log in