प्रेमझुला
प्रेमझुला
1 min
194
आजच्या या धकाधकीच्या जीवनात
अगणित झाले जगी या अत्याचार
प्रेमझुला झुलतच ठेव रे मानवा
करू नको तू कोणताही व्यभिचार...
माणूस म्हणून तुला जन्म मिळालाय
वागही तू इतरांशी माणसाप्रमाणे
नित चांगल्या विचारांच्या प्रेरणेने
प्रेमझुला फुलव अंतरी फुलबागेप्रमाणे...
अन्यायाचे वादळवारे थोपवून धर
न्यायाचे झुकते माप सदा तू ठेव
न्याय अन्याय करता करता मानवा
तू संपाचे माजवू नको बरं पेव.....
समाजात,कुटुंबात सदा वावरताना
नको कोणाचा द्वेश कधीच करूस
प्रेमझुला सतत हालताच ठेव तू
कोणासही कडक शासन नको देवूस...