प्रेमाची पावती
प्रेमाची पावती
1 min
241
जन्म झाला आईच्या पोटी
पालन केले प्रेमळ पित्याने
वाढवले आजीच्या संस्काराने
शाळा शिकले मित्रांच्या संगतीने....
कॉलेज झाले मध्येच मागणे आले
बोहल्यावर सान वयातच चढले
वैभवच्या संगतीने संसारात रमले
सासू सासर्यांची सेवा करू लागले..
सेवा करताना दिवस जाऊ लागले
प्रेमाचा झुला झुलू लागले
मायेच्या परक्या माणसांमध्ये रममाण झाले
सर्वांनाच समजावून घेण्यात दंगले....
हळूहळू प्रेमाची पावती मिळत गेली
सारी माणसं आपलीच समजून आली
सासूबाई प्रेमान वागू लागल्या छान
पतीसमवेत संसाराची कळी फुलू लागली,...