प्रेमाचा गुंता
प्रेमाचा गुंता
1 min
213
प्रेम प्रत्येकाचे असते वेगळे
व्यक्त होते आगळे वेगळे
दिसत नाही कधी कुणा
डोळ्यांतुन जाणायचे भाव सगळे ।१।
कधी तीच्या आठवणीत
दिवस रात्र वेडे व्हावे
तिने मात्र होकारात
सख्यास सदा नाकारावे ।२।
प्रेमाचा गुंता होत
जावा गोड नागमोडी वळणात
स्वीकारावे शेवटी दोघांनी
दोन हृदयाच्या मनात ।३।