Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Shobha Wagle

Romance Classics Inspirational

3  

Shobha Wagle

Romance Classics Inspirational

प्रेम

प्रेम

1 min
120


प्रेम दावले मी थोडेसे..म्हणून बसली प्रीती

आनंदाच्या झोपाळ्यावर ..नटून बसली प्रीती


तू राधा मी बासरी तुझी.. गाणे गाऊ आता

खेळ खेळण्या मस्ती करण्या ...हसून बसली प्रीती


श्रावणात ती भिजली कांती ..जल धारांनी सारी

चिंब भिजूनी वस्त्रे गेली...रुसून बसली प्रीती


ओल्या अंगी मिठीत घेता.. बावरले मन माझे

ओठा खाली शब्दा मागे ..दडून बसली प्रीती


हर्ष मनीचा नाही कळला..शांत मनाची खोटी

सृष्टी सारी रंगित झाली..जडून बसली प्रीती


रंगात अशी कशी बुडाले..भान राहिले नाही

प्रेमात अशी नशा चढाली.. हरून बसली प्रीती


मी राधा तू असा मुरारी..यमुना काठी वाटे

धुंद बासरी कानी पडली..हटून बसली प्रीती


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance