Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Savita Kale

Others

4.4  

Savita Kale

Others

प्रेम म्हणजे काय असतं?

प्रेम म्हणजे काय असतं?

1 min
422


प्रेम म्हणजे गुलमोहर

सुंदर असा बहर

मनाला हवीशी वाटणारी

एक प्रेमळ नजर


प्रेम म्हणजे निस्वार्थाचा झरा

स्वच्छ नि निर्मळ वाहणारा

त्याच्या सान्निध्यात येता

मी पणा गळून पडे सारा


प्रेम म्हणजे सुगंध लपलेला

तरी जाणवतो क्षणाक्षणाला

अर्थ प्राप्त करून देतो

अर्थहीन जीवनाला


प्रेम म्हणजे हवेसे बंधन

दरवळणारा सुगंधी चंदन

रहावे त्याच्या पाशातच

विसरून सारे तन-मन


प्रेम म्हणजे अशी शक्ती

जी वाळवंटाचेही नंदनवन करते

वादळातून नौका पार करून

आनंदाने जगायला शिकवते


Rate this content
Log in