The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW
The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW

MANJIRI NIMKAR

Others

4.5  

MANJIRI NIMKAR

Others

प्रेम भूमी आणि मेघाचे

प्रेम भूमी आणि मेघाचे

1 min
104


भूमी सांगे मेघा ला नको आता जास्त तडपवू !

कसे सांग बरे मी तुझा हा विरह आता सहन करू!

तुझ्या अमृत धारा तृप्त करतात माझ्या मना !

बरसणारे तुझे जल देई जीवनदान माझ्या तना!

खूप सारे इथे माझे पण तुझ्या सारखे नाहीच कोणी!

पण तुझ्या उशीरा येण्याने नाराज होणे मज आता सहन न होई!

जेव्हा तू येतोस मी तुलाच बिलगून नाही का असते!

तुझ्या धारेचा कण ना कण माझ्यामध्ये झिरपून घेते!

भीती असते सदा भरवसा तुझ्या बरसण्याचा कधीच नसतो!

लागलीच मला तुला जपून ठेवण्याचा मग मात्र विसरच होतो!

मग कधीतरी तुला माझी अचानक आठवण येते !

आणि तुझी स्वारी सारे बंध तोडून लागलीच अवतरते!

सांगू कसे तुला मला ही तूच हवाच आहेस जरी!

तरि पण मी नाही करू शकत तुझे स्वागत तेव्हा असे सत्वरी!

मी ही आहे खूप साऱ्यांची जननी, पोशिंदे जे विश्वाचे!

कसे सोडू मी त्या सगळ्यांना दुःखी कष्टी ,नुकसान त्यांचे बहुमोलाचे!

रागावून मग तू निघून जातो, खूप वेळ लागतो तुला मनवायला

कधी समजेल तुला माझी व्यथा, माझा वेळ नेहमीच खर्ची होतो कोप साऱ्यांचा निवारायला!

करू नकोस असे मी ही इथे आहे एकटी बिचारी

सदा अडकते मी पाशा मध्ये सगळ्या ,भारी ओझी डोक्यावरी!

माझ्या बरोबर असंख्य जीव माझ्यावर त्यांचे जीवन   

तूही च तर आहेस की त्यांना जल देणारा ,दिव्य तुझे अतःकरण!

तुझ्या वेळेत येण्या जाण्याने सगळेच खूप होतात आनंदित!

मग मी ही अगदी खुशीत असते घेते तुला अशी ओ॑जळीत!

तुझ्या माझ्या मिलनाने सारीच सृष्टी बहरून येते, गातात पक्षी गाणी!

 मनुष्य,प्राणी,गुरे वासरे झाडे झुडपे, सारेच तृप्त होती पिवूनी तुझे पाणी!

सांग मला मग तुझ्या माझ्या मिलनाचा अजून काय तो वेगळा अर्थ?

सारी सृष्टी हसरी राहावी नाहीतर आपले जीवन च नाही का रे व्यर्थ ?Rate this content
Log in