फुकट कसं यश हे मिळेल
फुकट कसं यश हे मिळेल
मोर्चात सामील सारेच झाले पाहिजे
जुनी पेन्शन ही मिळाली च पाहिजे
लक्षात हे घ्या रे, सामील सारे व्हा रे
फुगट कसं यश हे मिळेल ?
कधी तुम्हा हे कळेल....?
संघटन आपलं मजबूत हवं
साऱ्यांनी आता ध्यानी घ्यावं,
एकजुटीची ताकद आपल्या
शासनाला दाखवून द्यावं.
नको माघार, आहे शासन बेजार
या शासनाला ताकद आपली कळेल....
पेन्शन आमचं जीवन मरण
बंद का पेन्शन केली शासनानं?
करावं काय नी कसं जगावं
म्हातारपणी वाली कोण ?
कसं हे सरकार, उठलं जीवावर ?
दुःख आमचं हे कधी कळेलं....