Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

शिल्पा म. वाघमारे

Others

3  

शिल्पा म. वाघमारे

Others

फटाके... मुक्ती

फटाके... मुक्ती

1 min
288


परिक्षेची कटकट संपली

सुट्टी लागली शाळेला

आता काय मज्जाच मज्जा

धमाल होणार दिवाळीला... १


आईचं बाई पडलयं काम

हातभार लावूया थोडा

फावला मिळेल वेळ बाबांना

बनवू त्यांना आम्ही घोडा...२


लाडू करंज्या गोड गोड

कुरकुरीत चिवडा चकली

आईच्या हाताला चवच न्यारी

टाकता क्षणी तोंडात विरली..३


आई नेहमीच सांगत असते

भुकेल्यास द्यावा घासातला घास

म्हणूनच मी ही ठरवलं यंदा

ही दिवाळी करुया नक्कीच खास... ४


प्रदुषणमुक्ती आता माझ्या

भरली ध्यानी मनी पक्की 

शपथ पाळेल सृष्टीसाठी

फटाके नकोच मजला नक्की... ५


मोह मलाच माझा

हवा आता आवरायला

प्रकाशानेच उजळू मने

सर्वांनीच नको का ठरवायला... ६


Rate this content
Log in