फळांचा राजा
फळांचा राजा
सोनवर्णी
रसदार
आंबा फळ
चवदार (१)
कोकणात
आमराई
मोहरास
तरु येई (२)
अवकाळी
नको वर्षा
मोहरेल
तरु हर्षा (३)
कैरी खास
लोणच्यास
पाणी सुटे
रसनेस (४)
पन्हे डाळ
आवडते
पाड लागे
जडावते (५)
हापूसचा
आंबा खास
हाती येता
मधु वास (६)
मधुमासी
ओढ लावी
सुटीमधे
जावे गावी (७)
सान मोठे
रसामधे
चढाओढ
खाण्यामधे (८)
आम्रखंड
मधुरचि
रसनेला
इच्छा पूर्ती (९)
वेड लावी
सकलांना
रसराजा
खवैय्यांना (१०)