पहिली नजर
पहिली नजर
1 min
290
अवचित अशी, भेट ती आपली,
पहिली नजर, प्रीत ही जडली!
थेंब पावसाचे, गाली ओघळत,
हृदय दालनी, मधु पाघळत!
इंद्रधनु होता, त्या सावळ्या नभी,
प्रेमरंगी भिजे, संध्या ती उभी!
शब्द उमलण्या, अधर विचल,
भाव साचलेले, नेत्रात अचल!
मन भिरभिरे, आठवांच्या दारी,
जपून ठेवली, वेळ ती सारी!