Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Sailee Rane

Others

4.8  

Sailee Rane

Others

पहिला पाऊस

पहिला पाऊस

1 min
13.7K



येई हळूच ती सर

होई मन चिंब चिंब

आठवांचा येई पूर

दिसे त्यात प्रतिबिंब


कशी आवरू स्वतःला

येई आठवण तुझी

गेला दूर तू कशाला

वाट पाहत रे तुझी


पावसाच्या सरी सवे

भासे एकले एकले

अश्रू नयनी न मावे

तुला स्वप्नात पाहिले


नको वाटे हा पाऊस

ओढ तुझी मना लागे

नित्य तुझे होती भास

तुटतील का रे धागे


दाटे मनात काहूर

नको हे जीवन वाटे

तुझ्याविना अशी दूर

सारे संपवावे वाटे


Rate this content
Log in