पावसाळा
पावसाळा

1 min

71
चिंब चिंब भिजून जातो
कोपरा न कोपरा तुझ्या येण्याने
मातीचा गंध मग पसरतो
अन सारे भिजतात आनंदाने
तहाणलेल्या जमिनीला मग
उमाळे लागतात फूटू
हवेतला उष्मा जाऊन
गार वारा लागतो सुटू
सुकलेल्या अंकुराच्या अंगाशी
येवू लागते बळ
हिरव्यागार पात्यांनी सारा
सजू लागतो माळ
पाखरांच्या किलबिलाटाने
जागा होतो गाव
विहीरीवरली करकरणारी
ऐकू येते मोटेवरली धाव
पावसाळा आला की
सार कस आल्हाददायक होतं
पेरणीच गाणं गाताना
शेतकर्याला समाधान होतं