STORYMIRROR

Sanjay Gurav

Romance

3  

Sanjay Gurav

Romance

पाऊसभेट

पाऊसभेट

1 min
36


तिच्या मनात पाऊस 

नेहमीच रुंजी घालायचा

आठवण काढलीच कधी

तर तोही हमखास यायचा


डोळ्यातलं पाणी तिच्या

न्यायचा सोबत वाहून

मळभ दाटलेलं मनातलं

पाहायचा ढगांच्या आडून


कधी कातरवेळी एखाद्या

तोही काढायचा खोडी

तीही पडायचीच बाहेर 

तोडून पायातली बेडी


नाचताना चिंब पावसात

उरात वणवा पेटायचा

तिच्या डोळ्यातला पाऊस

जेव्हा पावसाला भेटायचा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance