पाऊस
पाऊस




या पावसाला ना .. लागलंय खूळ
कोणीतरी शोधा ना.. हो याचं मूळ
शेताभाताचे .. नुकसान होतंय
मला म्हणतो.. माझ काय जातंय!!
असा का उठतो याच्या पोटशुळ?
कधीतरी तो.. धुव्वाधार पडतो
कधीतरी कसा .. पाठ फिरवतो
पण सार्यांना पडते .. याची भूल!!
कधीतरी लोकांना .. नकोसा होतो
येत नाही तेव्हा .. यावासा वाटतो
सांगा तरी याचे .. कुठले हो कुळ?