Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Rajesh Sabale

Others

2  

Rajesh Sabale

Others

पाऊस येत आहे

पाऊस येत आहे

1 min
6.9K


झुलवीत त्या धुक्याला, वारा खेळवीत आहे।

कवेत घेऊन धुक्याला, पाऊस येत आहे।। 

रिमझिम पावसाने, तरु-लता रानवेली।

झाडे फुले कळ्या ही, भिजलीत चिंब ओली।। 

हळुवार वर खाली, धुके झेपावत आहे।

जणू चंदेरी फुलांचा, झोपाळा झुलत आहे।। 

 छेदित त्या धुक्याला, पडे तिरीप त्या उन्हाची।

भासे मनात माझ्या, जणू धार ती दुधाची।। 

डोगर दरी कपारी, कापूस पिंजला आहे।

भोवताली पसरलेला, जणू गालीचाच आहे।। 

 हिमगौरी कंचनाचा, पडे कवडसा उन्हाचा।

धरती वरी विराजे, खेळ ऊन सावलीचा।। 

मऊ मखमली धुक्याने, आसमंत भरला आहे।।

जणू चंदेरी धिक्याचा, हा पाळणाच आहे।। 

 ओल्या चिंब पावसाने,  भिजला शिवार सारा।

बोचऱ्या थंडीत माझ्या, फुलला मनी फुलोरा।। 

न्हाऊन निघे धरती, नदी-नाले भरून वाहे।

नेसून शालू हिरवा, नववधू अवतरली आहे।।


Rate this content
Log in