Priti Dabade

Inspirational Others


3  

Priti Dabade

Inspirational Others


पाणी-जोडकाव्य

पाणी-जोडकाव्य

1 min 172 1 min 172

उपासतापासात स्रिया

काहीच न खाती

काहीजणी तर पाणी

पण वर्ज्य करिती


गप्पागोष्टी करत बायका

नळावर पाणी भरती

सकाळचा वेळ कसा जाई

हे त्यांनाच न उमगती


ताजेतवाने वाटे पाणी                         

चेहऱ्यावर शिंपडता  

तृप्त होते मन             

उन्हात थंडगार पाणी पिता


पीकपाणी कसे होणार

ठरते पावसाच्या पाण्यावर

शेतकऱ्याच्या डोळ्यांत दिसते पाणी

पर्जन्यवृष्टी नाही झाली तर


नदीनाल्यांत पशुपक्षी छान

विहार करिती

पाणी सोडूनि बरोबर 

भक्ष्य टिपती


Rate this content
Log in

More marathi poem from Priti Dabade

Similar marathi poem from Inspirational