Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Anupama TawarRokade

Classics Inspirational

3  

Anupama TawarRokade

Classics Inspirational

पांढूरंगाची मानसवारी

पांढूरंगाची मानसवारी

1 min
192


कुठे चुकलीय पांढूरंगा आमची वारी

नित्य चाललीय मानसवारी तुझ्या दारी


उपाशीपोटी रोज तुझे होते नामस्मरण

शोध कामाचा करतांना येतो तुला शरण


मैलोंनमैल तुडवले काम शोधतांना

वारी तुझी कामातच राम जोडतांना


कधी भेटलास मज काम देतांना

कधी भेटलास ओझ्याला सावरतांना


अतंर फक्त मैलाचे असेल आपल्यात

अतंरात सदा आहे तुझा ठाव

सत्यात


कधी बनून शिक्षक वाट दावसी

कधी बनून आत्मविश्वास भावसी


आंधळ्याची होऊन काठी रस्ता करी पार

आईबाबा बनून दावीला जीवनाचा सार


संकटे दावून सहशीलतेचा लावलासी कस

दाता बनून कधी पुरवीशी अन्न सकस


कधी शेतात होऊन पाऊस बरसतोस

शेतकऱ्याच्या रूपाने धनधान्य पिकवतोस


भेटशी डॉक्टरांच्या रूपात रूग्नांना

कल्पना बनून कधी बळ देशी माझ्या शब्दांना


कुठे चुकलीय पांढूरंगा आमची वारी

नित्य चाललीय मानसवारी तुझ्या दारी


Rate this content
Log in