Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Supriya Devkar

Abstract Classics

3  

Supriya Devkar

Abstract Classics

पालखी

पालखी

1 min
130


आम्ही पालखीचे भोई

वाटे अभिमान त्याचा 

देव सोबतीस असे 

भास नियमित ज्याचा||१||


पुष्प मालांनी सजली 

दिसे अनोखी पालखी

 देव बैसले आनंदे

सोबतीस त्यांची सखी||२||


मनोहर असे दृश्य 

घुमे अस्मानी घोषणा 

भक्त करती अर्चना 

ध्यास तुझ्याच दर्शना||३||


लक्ष्मी नारायण जोडा 

रुप न्याहाळावे किती 

आली देवाची पालखी

 दिंड्या पताका नाचती||४||


जयघोष करी भक्त 

सारे गुलालात रंगे 

गाव प्रदक्षिणा घडे 

चला पालखीच्या संगे||५||



Rate this content
Log in