Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

sarika k Aiwale

Romance

3  

sarika k Aiwale

Romance

पाहिले न मी तुला

पाहिले न मी तुला

1 min
209


पाहिले ना मी तुला 

तू मला न पाहिले

ना कळे तरी कसे

मन माझे हे गुंतले ....1


कल्पना तुझी मला

का अशी सतावते

चित्रातल्या  कथेपरी

भासातही भारावते

पहिले न मी तुला

तू मला न पाहिले

अनोळखी नाते तरी

या मनी रुजावले ....2


सांज एकली मनी

चंद्रास चांदणीझुरते

भाव मिलनाचे ते

क्षितिजावर उमटते

पाहिले न मी तुला

तू मला न पाहिले

अधिर का मी अशी

जग वेडे हे पुसते ....3


जगी या मनाला का

तुझेच रुप ते भावते

कल्प्नेचा कुंचलाही

तूझे चित्र रंगवते

पाहिले न मी तुला

तू मला न पाहिले

ओळखी ती जन्माची

नात तुझ्याशी गोवते ....4


तुझ्या शिवाय जगणे

मला कठीण वाटते

असे गुंतने तुझ्यात

भाव मनी सुखावते

पाहिले न मी तुला

तू मला ना पाहिले

खुळी प्रित अबोल ती

तुझ्यावरी मी केली ....5


अजुनी भेट ना आपली

विरहाच भय का अंतरी

भेट व्हावी एकदाची

व्हावे ते ही स्वप्ने खरी

पाहिले ना मी तुला

तू मला ना पहिले....

तरी तुझ्यासवे मी

जग माझे गुंफले.....6


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance