Participate in the 3rd Season of STORYMIRROR SCHOOLS WRITING COMPETITION - the BIGGEST Writing Competition in India for School Students & Teachers and win a 2N/3D holiday trip from Club Mahindra
Participate in the 3rd Season of STORYMIRROR SCHOOLS WRITING COMPETITION - the BIGGEST Writing Competition in India for School Students & Teachers and win a 2N/3D holiday trip from Club Mahindra

Yogita Takatrao

Others

3  

Yogita Takatrao

Others

ओंजळ फुलांची

ओंजळ फुलांची

1 min 228 1 min 228

ओंजळ फुलांची अवचित अशी सांडली...

काय! काय! निसटले त्यातून नकळतपणे ?

शब्दांचे मोती, कवितांची रास शांतपणे  

अस्तित्व राखूनच कशी सुरात ओघळली ?

फुलांबरोबर आठवणी जरा डोकावल्या...

स्मृतीगंधातही जणू पुन्हा न्हाऊन गेल्या ?

कुठेतरी दूरवर गतकाळी भावना नेल्या 

आमंत्रणाविना! जशा कोणी बोलावल्या ?

एकेक फुलाची मृदू पाकळी सुगंधित....

आयुष्याचं गुपित का रे त्यात मिश्रित ? 

सुखाचे गणित सारे अनुबंधात एकत्रित 

प्रसन्नता करून गेली आत्मा प्रफुल्लित !

जपावा हा अनमोल आठवांचा ठेवा...

वाटावा मजलाच माझा अनपेक्षित हेवा !

Rate this content
Log in