Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Samadhan Navale

Romance Tragedy

3  

Samadhan Navale

Romance Tragedy

ओढ

ओढ

1 min
224


कशी ही ओढ मनाला लागली ग साजणी

तुुुुझेच रुप मनाला,दिसे कसे रातदिनी ||

अन्य काम मज जसे काहीच नाही

दीनरात अंतरात मी तुला-तुलाच पाही,

असे का ? कळेना मजला, तुजविण सुचेना काही

फक्त एक भेट आपली, तीही जरा अधुरी

तरी मन हे वेडे माझे,मरते का ग तुझ्यावरी? 

प्रेम म्हणावे याला तर तेही जरा अशक्य..

प्रेम म्हणजे दोन जीवांचे मिलन,

आचाराचे विचारांचे मिलन..

एक मेका समजण्याचे, अनुभवण्याचे,

प्रेम असते विश्वासाचे मिश्रण !

तसे आहे का आपले प्रेम?

उत्तर असेल नाहीच नाही,

तु आली, बोलुन गेली..

फक्त आपली नजरानजर झाली,

तरीही क्षणात तुझी पापणी का लवुन गेली?

समजावे तरी कसे तुुुझे, प्रेम मुक संमतीने मला ?

लाजऱ्या चेहऱ्यात तुझ्या त्या...

दीसलेे न समर्पण मला,

तरीही मनाला एक, अंधुकशी आहे आशा

कि असेल आतुन प्रतिसाज,नि चेहऱ्यावर उमटली लाज

काहीतरी अर्थ असणारचंं तुझी पापणी लवण्याचा

याच मृगजळात आता , मार्ग शोधतोय जगण्याचा

समजशील मला आणि माझ्या प्रेमाला

तेेेेेेव्हाच चैन मिळेल, धगधगत्या या जीवाला.||


Rate this content
Log in