ओढ...
ओढ...
1 min
327
काळ्याशार ढगांची साथ सोडून
निमिषार्धात जमीनीवर येणाऱ्या पावसाला
इतकी का ओढ असते जमिनीची ?
तिच्या तृषार्ततेची धग कशी पोहोचते ढगांपाशी?
पावसाचं असं आवेगाने जमिनीकडे येणं
आणी तीला भिजवत रहाणं ही त्याची ओढ की फक्त गुरुत्वाकर्षणाचा नियम?