ओढ पावसाची
ओढ पावसाची

1 min

316
तप्त वसुंधरेची आर्त साद घे ऐकुनी
कोमेजल्या तनास दे तू नवसंजीवनी
तनास शृंगारित कर तू चिंब चिंब भिजवूनी
बघ आतुरली ती नटण्या हिरवा शालू लेवूनी
जगाच्या पोशिंद्यास धीर दे तव कृपाशिर्वादानी
आकाशी बघत बसे तो मोठी आस लावूनी
पाखरे सैरभैर होती तुझ्या आगमनी
चातक चकोर व्याकुळ होई प्राशना तव पाणी
हे बा पावसा टाक सर्व बंधने झुगारूनी
सकला तृप्त कर तू बेधुंद कोसळूनी