Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Manisha Awekar

Abstract

3  

Manisha Awekar

Abstract

नववर्ष स्वागत

नववर्ष स्वागत

1 min
222


नववर्षाच्या स्वागतासाठी

आतुर वसुधा उमलली

शुभ्र मोगरा परिमल गंध

मधूकूजन कोकिळकंठी 


सण आरंभाचा पाडव्याचा

मान मिळे शुभ मुहुर्ताचा

गुढ्या तोरणे घरे सजली

शुभ दिन राघव येण्याचा


स्वागत करु नववर्षाचे

प्रथम वंदन गणेशाला

देई शक्ती नि बुद्धिसंपदा

पडो पाऊल ध्येय पथाला


देऊ हात अनाथ दीनांना

करु जीवन सुकर त्यांचे

भुकेल्यांना अन्न देऊनिया

तृप्त करुयात क्षुधाब्द्धिते


परोपकारार्थ संकल्पांची

करु पूर्तता तत्परतेने

कुणी बेघर , कुणी उपाशी

हात मदतीचा मानवतेने


एक विनवणी वर्षारंभी

परमेशा तुजला करते

दीर्घ आयुरारोग्य लाभावे

सुखी असोत तुझी लेकरे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract