नववर्ष स्वागत
नववर्ष स्वागत
1 min
227
नवीन वर्षात
झाले पदार्पण
आशेचा किरण
जपूया मनात ...
करूया प्रार्थना
देवाच्या चरणा
आरोग्य साधना
लाभू दे रे जना ...
फेकुन देऊया
त्या दुष्ट शक्तींना
मनात जपूया
त्या प्रेम भावना ...
सारे हेवे दावे
सोडूनची देऊ
मैत्रीचे ते नाते
आयुष्यात जोडू ...
नव्या वर्षातल्या
नव्या संकल्पना
सिध्दीस नेऊया
पुर्तता करूया ...