नवरात्री नऊ रुपे
नवरात्री नऊ रुपे
पहिला दिवस शैलपुत्री
पर्वत कन्या होय
निसर्ग रूपात पिवळ्या
रंगात हर्ष उल्हासात जाय
हिरवा तो ब्रह्मचारिणी
पति शोधात पार्वती
शिव शोधण्या व्रत
पूजा करी सांगाती
चंद्रकोर चंद्रघंटा
राखडी रंग जाणावा
शत्रूचा विनाश दिनी
तिसरा आणि घ्या विसावा
चोंदे रुप कुष्मांडा
नारंगी रंग हास्यते
तेजाने देवीच्या
सूर्यही फिका पडते
स्कंदमाता पांढरे
वस्त्र परिधान करती
सहावे लाल सातवे
गडद निळा विनाशती
गुलाबी जांभळा
महागौरी सिद्धिदात्री
गुलाबी ताजेपणा
जांभळा समाप्त नवरात्री