नवा संसार
नवा संसार


परके आता माझे घर परकी सारी नाती गोती
जेव्हा माझा हात तुझ्या घेतलास सख्या हाती...
बालपण माझं इथे गेले रे सुखात झळ नाही लागली कधी
अजून दुःखात आता बघ मला किती नवीन नाती जोडायची
तुझ्यापासून सुरू होऊन तुझ्यापर्यंत मानायची
सुखात संसार होईल तुझ्या माझ्या ओढीने जगणे ही सोपे होईल
नात्यातल्या गोडीने एकच सांगणे तुला मला समजून घे
प्रेमात आपल्या नातं फुलुन येऊ दे