नव-साजरी
नव-साजरी
स्पर्श तुझाच होता,
'काळीज धस्स होई'
येई का शिसारी
आज स्पर्श होता (१)
नजर तुझीच होती
हृदयभेद करणारी
होई का कावरी
आज मज पाहता (२)
बोलणे तुझे मधाळ
मन आनंदून जाई
शब्दांची ही लाचारी
आज मज संबोधता (३)
चालणे तुझे नखरेल
हृदय घायाळ होई
पावले वळती माघारी
आज मज साथ देता (४)
मन तुझे आवरी
वाहू दे अश्रुसरी
मोकळ्या मनावरी
लिही नव-साजरी (५)