नजरानजर
नजरानजर
नजरानजर चोरटी तुझी
तरीही मी शांत होते
तुझ्याच अवलिया खोड्या
नजरेने मी टिपत होते
तुझा खोडकर नखरा
गुपचूप मी सोसत होते
तुझ्याच मिश्कील चाड्या
करड्या नजरेने रोखत होते
तुझ्या नकळत माझे
आळवावरले पाणी झाले होते
तुझ्या सोबतीसाठी आता
मी गहिवरले होते
तुझा सहवास अलिकडे
हवाहवासा वाटत होता
नजरानजरेतील इवलूसा
कवडसा मज भासत होता