नितीमत्तेच्या नजरेतून - विश्वास
नितीमत्तेच्या नजरेतून - विश्वास
बंद दरवाजे सारे
घरी सगळी शांतता,
असे सदा विचारात
दिसे सारी एकांतता. ||१||
कुठे गेली नीतिमत्ता
स्वप्न झाले भंग सारे,
सदा मुखी उच्च गुण
दंग पाहून हे सारे. ||२||
कष्ट करी वर्षभर
वृत्ती सदा अभ्यासक,
लोक काय म्हणतील
याचा विचार निःशंक. ||३||
लोक काय म्हणतील
याने सारे घाबरे रे
ठेव लोकांना बाजूला
जरा विश्र्वास ठेव रे ||४||