Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Savita Kale

Romance

4.8  

Savita Kale

Romance

नित भेट तुझी घडावी

नित भेट तुझी घडावी

1 min
121


निळ्या आसमंताखाली

नित भेट तुझी घडावी

माझ्यावर सखे तुझी

अमरप्रीत जडावी


शांत सागर किनारी

भेटाया मज तू यावी

मला पाहून गालावरची

खळी गोड खुलावी


नयनांची भाषा पाहून

शब्दांची भाषा लाजावी

प्रीत तुझ्या मनातली

न सांगता कळावी


माझ्या अंगणीची तू

रातराणी व्हावी

श्वासाची झोळी माझी

तव सुगंधाने भरावी


तुझ्या सवे संसारी

प्रीत आपुली रमावी

ये आता मम जीवनी

किती वाट तुझी पहावी?


Rate this content
Log in