निसर्ग सौंदर्य
निसर्ग सौंदर्य
नभ निळे उनाड वारा
शाल हिरवी पांझरे धरा,
कपारी मधुनी खुणावतो
आसमंतीचा नजारा
प्रतिबिंब गगनाचे
उमटे जणू जलावरी
पाणीही निळे निळे
थेंब पसरती या लहरी
देखणा डोंगरकडा
अविष्कार निसर्गाचा
शांत निर्झर वाहे झरा,
प्रफुल्लित मनाचा
उतरुनी मेघ आले,
शुभ्र धवल कांतीचे,
शोभिवंत तो डोंगरमाथा,
वेगळ्या या कहाणीचे
नाद प्रतिध्वनीचा घुमता
सादेला प्रतिसाद मिळता
आनंदाची लहर उठे
आकाश मुठीत सामावता