Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Bharati Shinde

Tragedy

3  

Bharati Shinde

Tragedy

निशब्द

निशब्द

1 min
220


एका नवीन वाटेवरती

चालताना मिळाली तिची साथ 

मी होते एकटी,अबोल ,घाबरलेली

 तिने केला पुढे मैत्रीचा हात ...

तिचे माझे जुळले सूर

दूरदेशीचे दोन जीव

झाले एकमेकांसाठी आतूर

नसे एक तर भासे उणीव....

एकमेकांच्या आधाराने घालविले

आयुष्याचे अनमोल क्षण 

कधी रुसवा कधी गोडवा 

प्रेमाचे हे अनमोल धन ....

शिकण्याचे दिवस सरले 

संसाराचे वेध लागले

आयुष्याच्या या वळणावरती 

दोघींचेही मार्ग बदलले....

संसार सुखाचा सुरू झाला 

मैत्रीचे नाते अतूट राहिले

कधी काळी पत्रातून डोकावणारे

मन मोबाईल फोनने जोडले....

तिचे बोलणे तासंतास 

आपुलकीचे सुस्वर आज 

निशब्द झाले, निशब्द झाले...

अचानक, ती सोडून गेली

 अर्ध्यावरती डाव मोडूनी

सोडून गेली सगळ्यांनाच

मागे राहिल्या आठवणी....


Rate this content
Log in

More marathi poem from Bharati Shinde