निखारा
निखारा
1 min
61
कशाला व्यर्थ जमवावा पसारा?
क्षणातच डाव आहे संपणारा
कधी नात्यात जर आला दुरावा
तिथे मग भावनांचा कोंडमारा
तुला जाणेच आहे अंतकाळी
तिथे नाही कुणाचाही सहारा
भवाच्या सागराचे नीर नाकी
तुला गवसायचा नाही किनारा
जपायाचे किती बघ चालतांना
पथावर 'पंडिता' असतो निखारा
****