निःशब्द
निःशब्द
1 min
141
मधुरता वाणीमधे
शालीनता कृतीमधे
तत्परता कामामधे
मन रमे सख्यांमधे
काय वर्णावे चित्रांना!
केले सजीव तयांना
सुबकशा कौशल्याला
रंगांसवे शोभताना
जीव ओतुनी चित्रांत
साधले एकरुपत्व
पारितोषिके खैरात
नम्रता जपले तत्व
लडिवाळ कवितेला
हळुवार तू जपले
क्षण अंतिम येताही
तिला नाही सोडले
शब्द सखीचे फुलती
नित्य हास्यरसामधे
कशी गेलीस सोडूनी!
आम्हां शोकसागरामधे!