Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Pavan Kamble

Others

3  

Pavan Kamble

Others

निघालोय मी..

निघालोय मी..

1 min
169


निघालोय मी..


निघालोय मी माझ्या कवितेच्या गावी

शब्दांची आलीय ही रेल गाडी..


बसलोय मी हळव्या मनाच्या बाजू

डोळयांनी पाहतोय मी शब्दांची ही जादू..


एक एक शब्द मागे पडत होता

शब्दांच्या रेल गाडीलाही आता वेग आला होता..


हसत खेळत शब्दांचा माझ्या हा प्रवास चालू होता

हळूच खिडकीतून हा थंड वारा लागत होता..


शब्दांची ही जागा होती खूपच छान

एक एक शब्द जणू होती माझी जाण..


थोडं दूर होत माझ्या हे कवितेचं गावं

तरीही प्रवास चालत रहावा असाच हा लांब


ओढ माझी घेत होती थोडी धाव

शब्दांची गाडी जरा आणखी थोडी धाव..


बघता बघता जणू आलं माझ्या शब्दाचं हे गाव

उतरून पाहिलं तर होत हे माझ्या कवितेचं गावं..


हळव्या मनांनी भरलेलं हे माझं गाव

पाहता क्षणी उर माझा भरून आला राव


मनातून माझ्या कविमनाचा आवाज बाहेर आला

आलं म्हणे आता माझ्या कवितेचं गाव.


Rate this content
Log in