नातं प्रेमाचं
नातं प्रेमाचं
नजरेला नजर जुळतं असते,
मनाला मन भिडत असते,
नं बोलताही झुरत असते,
प्रेमाचं नातं असंच असते.........
दोघांतही संवादाचे स्वरूप नसते,
अंतरंगात अंकुर जागृत असते,
हिरवळ प्रेमाची रंगत असते,
प्रेमाची दयाळू संगत असते......
हाताला स्पर्शाची साद असते,
थांबलेल्या क्षणाला साथ असते,
मिठीत प्रेमाला भान नसते,
पडछायेतही प्रेमाचे रंग दिसते........