नाते
नाते
नजरेस पडते
तेच खरे नसते
मन खरे सांगते आज
सावलीसुद्धा खोटी भासते
कुणासाठी नटणे नसते
मुरडणे नसते
आजकाल मन
आठवणीच्या धुक्यात भासते
नाते किती घट्ट होते
जणू डोळे अन् पाणी
मन थांबलं स्वप्नात
कधी गात होतो गाणी
मन कितीही भरु दे
पुढे ठेच हो लागते
ज्यांनी भरले हो मन
त्याची नियत सांगते
आई बाप ते पोसती
मन भरुनी हो जगा
जीवन करा हो स्वच्छंदी
नको प्रेम आणि दगा
दिस रात एक करे
घरटे बांधण्या सुगरण
मन मारुनी ती जगे
करे जीवाची वणवण
नका जाऊ कुणी कुठे
अहो प्रेम सगळे खोटे
तुम्ही स्वतःला घडवा
विश्व तुम्हास हे मोठे
मन म्हणते माझे जावे
निळ्या आभाळी फिरावे
चांदण्यांना घेऊन कवेत
लख्ख प्रकाश पाहावे
जिवलग कोण जाणे
कसा गेला तो सोडून
काळीज जिंकून घेतले
मन गेला तो मोडून
दिवस गेले सारे
राहिल्या रे आठवणी
किती छान होते सगळे
मन करते हो साठवणी
मन माझे जाऊन आले
खोल पाण्यात बसावे
त्या पाण्याच्या तळाशी
जाऊन अश्रू ते पुसावे
कसे मन हे मोकळे
कधी खोटे कधी खरे
करू कशी मी पारख
रोज काळीज हे मरे
माझ्या मनातल्या गावी
कधी जाऊन मी यावे
रोज रोज त्या भावनांना
जरा निरखून पाहावे
भोळ्या मनाला समजवा
जो आई बापाला मुकला
प्रेम करून वाया गेला
तो खऱ्या जीवनाला चुकला
माझे मन सैरभैर
कसे फिरते वणात
पाखरांच्या सवे मी
उडते क्षणात