नांगराचा फाळ
नांगराचा फाळ
1 min
329
माझ्या बापाचं कपाळ
जसा नांगराचा फाळ
काय लिहिलं नशिबी
कधी जाईल दुष्काळ
माझ्या शेताची ही वाट
नागमोडी वळणाची
जातो वावरात सकाळी
वेळ झाली न्याहारीची
माझ्या बापाची बैलजोड
बैलाला थोडी खोड
बैल चारतो शेतात
कधी सुटल हे कोडं
कोणी सांग तुझा बाप
खूप कष्टकरी लेका
माझा बापाची ही व्यथा
तुम्हाला सांगतो मी ऐका
माय करते मजुरी
तेव्हा मिळते भाकर
बापू जेव्हा घरी येई
होई जीवाला आधार